पत्रकारिता, मानवी हक्क अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू

0

रत्नागिरी : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सर्व अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया १ जुलैपासून सुरू झाली आहे. रत्नागिरीत पत्रकारिता पदविका आणि मानवी हक्क शिक्षणक्रम हे दोन अभ्यासक्रम दैनिक रत्नभूमी जर्नालिझम कॉलेजमध्ये सुरू करण्यात आले आहेत.

पत्रकारिता पदविका अभ्यासक्रमाला बारावी उत्तीर्ण किंवा बारावी समकक्ष कोणताही शासनमान्य कोर्स तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा पूर्वतयारी अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्यांना प्रवेश मिळेल. मानवी हक्क शिक्षणक्रमासाठी १० वी उत्तीर्ण तसेच १० वी समकक्ष कोणताही शासनमान्य कोर्स तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा पूर्वतयारी अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्यांना प्रवेश मिळेल.

शिक्षणक्षेत्रात काम करण्याऱ्या शिक्षकांना बी.एड डिग्रीच्या प्रवेशासाठी हे दोन्ही कोर्स उत्तीर्ण असल्यास अधिक गुणांचा भारांक मिळतो.

रत्नागिरीतील मुक्त विद्यापीठाचे अभ्यासकेंद्र दैनिक रत्नभूमि जर्नालिझम कॉलेज, ३/२०८, पत्रकार कॉलनी, रेल्वे स्टेशनसमोर, कुवारबाव, रत्नागिरी येथे या अभ्यासक्रमांचे प्रवेश घेण्यासाठी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९७६३०४७७८७, ९६०७८०९३४३, ९९२१८७९६६०, ०२३५२-२२९९३९ या क्रमांकांवर संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here