राज्यातील कोरोनाग्रस्तांचा तीनशेचा टप्पा पार

0

राज्यात कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. काल रात्री ११ वाजेपर्यंत राज्यात कोरोनाचे २२० रुग्ण होते. मात्र आज सकाळी नऊ ते सहा वाजेपर्यंत यात ७२ रुग्णांची वाढ झाली असून तो आकडा आता ३०२ वर जाऊन पोहचला आहे. त्यामुळे आता राज्य शासनाची चिंता अधिक वाढली आहे. मुंबईतील खासगी रुग्णालयातील टेस्टींग लॅबमधील आकडेवारी उपलब्ध झाल्यामुळे मुंबईत एका दिवसात ५९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. या सर्व रुग्णांचे अहवाल देखील पॉझिटिव्ह आल्याने आता राज्यातील कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या ३०२ वर जाऊन पोहचली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ५९ नवे रुग्ण मुंबई, पुणे २, ठाणे २, केडीएमसी २ नवी मुंबई २, वसई विरार २ असे एकूण ७२ रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे उच्चभ्रू वस्तीतील हा आजार आता झोपडपट्टी आणि चाळीत पसरल्याने मुंबईकारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

IMG-20220514-WA0009

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
7:17 PM 31-Mar-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here