रत्नागिरी ग्राहक पेठतर्फे श्रावण महोत्सवाचे आयोजन

0

रत्नागिरी : रत्नागिरी ग्राहक पेठेतर्फे श्रावण महोत्सवाचे आयोजन केले आहे. येत्या १२ ते १६ ऑगस्ट या कालावधीत श्रावण महोत्सवानिमित्त प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे.

महिला बचत गटातील महिला आणि इतर उदयोन्मुख उद्योजिका महिलांना व्यवसायाची सुवर्णसंधी आणि गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी ग्राहकांना विविध आकर्षक वस्तू एकाच छताखाली मिळणार आहेत.

हे प्रदर्शन शांतीनगर (नाचणे) येथील बालाजी मंगल कार्यालयात होणार आहे. प्रदर्शनाची वेळ सकाळी ११ ते रात्री ८.३० अशी आहे. प्रदर्शन कालावधीत विविध पारंपरिक खेळ, फुगड्या यांच्या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. स्टॉल बुकिंगसाठी प्राची शिंदे (९४२२३७६२२४) यांच्याशी किंवा ९७६४४१७०७९ या क्रमांकावर त्वरित संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 AM 21-Jul-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here