माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं निधन

0

नवी दिल्ली : भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं निधन झाल्याची बातमी हाती येतेय. मृत्यूसमयी त्या ६७ वर्षांच्या होत्या. सध्या हाती आलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री ९.०० वाजल्याच्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र धक्का बसल्यानंतर त्यांना तातडीन रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयक सोमवारी राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर आज लोकसभेतही बहुमतानं मंजूर करण्यात आलंय. सोमवारी राज्यसभेत १२५ विरुद्ध ६१ तर आज लोकसभेत ३७० विरुद्ध ७० अशा बहुमतानं हे विधेयक मंजूर करण्यात आलंय. यावरच, मंगळवारी सायंकाळी ७.२३ वाजता सुषमा स्वराज यांनी सोशल मीडियावरून प्रतिक्रिया व्यक्त केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here