दिल्लीतील निजामुद्दीन मरकज येथे कार्यक्रमाला गेलेल्या रत्नागिरीतील ८ ते १० जणांचा शोध सुरु

0

रत्नागिरी : निजामुद्दीन मरकज येथे जवळपास १७०० लोक धार्मिक कार्यासाठी जमले होते. त्यापैकी बरेच जण परदेशातून देखील आले होते ज्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. या लोकांच्या संपर्कात आल्यामुळे इतरांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत २४ जणांना संसर्ग झाला आहे आणि ३०० पेक्षा जास्त लोकांमध्ये कोरोनाची लक्षण दिसून आली आहेत. अनेक लोक येथून इतर राज्यात गेल्याची माहिती मिळत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून याच कार्यक्रमासाठी गेलेल्या ८ ते १० जणांचा शोध पोलिसांकडून सुरु आहे. त्या त्या तालुक्यातील तहसीलदारांकडून पोलिसांच्या मदतीने या सगळ्यांचा शोध सुरु असून रत्नागिरीकरांसाठी हि गोष्ट चिंता वाढवणारी आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
11:40 AM 01/Apr/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here