ऋषी सुनक पाचव्या फेरीतही अव्वल, ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आता फक्त दोनच नावे

0

ब्रिटिश पंतप्रधानपदाच्या शर्यतीत भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे पाचव्या फेरीतही आघाडीवर राहिले आहेत. त्यांना 137 मते मिळाली. मतदानाच्या पाचव्या फेरीनंतर मंत्री पेनी मॉर्डाउंट पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून बाहेर झाल्या आहेत.

त्यांना 105 मते मिळाली. आता सुनक यांचा सामना परराष्ट्र मंत्री लिझ ट्रस यांच्याशी होणार आहे. त्यांना पाचव्या फेरीत 113 मते मिळाली.

पाचव्या फेरीत ऋषी सुनक यांना सर्वाधिक मते मिळाली आहेत. चौथ्या फेरीच्या मतदानात त्यांना 118 मते मिळाली होती. चौथ्या फेरीच्या मतदानात त्यांना 118 मते मिळाली. सोमवारी झालेल्या तिसऱ्या फेरीच्या मतदानात त्यांना 115 मते मिळाली. तसेच दुसऱ्या फेरीत 101 तर पहिल्या फेरीत 88 मते मिळाली. तर लिझ ट्रस यांना चौथ्या फेरीत 86, तिसऱ्या फेरीत 71, दुसऱ्या फेरीत 64 आणि पहिल्या फेरीत 50 मते मिळाली. पेनी मॉर्डाउंट यांना चौथ्या फेरीत 92, तिसऱ्या फेरीत 82, दुसऱ्या फेरीत 83 आणि पहिल्या फेरीत 67 मते मिळाली.

याआधी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यावर नाराजी व्यक्त करत सरकारमधील काही मंत्र्यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा दिला होता. यामध्ये सुनक यांचाही सहभाग होता. यानंतर बोरिस जॉन्सन यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला. पुढील नेत्याची निवड होईपर्यंत जॉन्सन पंतप्रधानपदी राहतील. दरम्यान, ब्रिटनच्या पंतप्रधानपदी सुनक बसू नये, अशी बोरिस जॉन्सन यांची इच्छा असल्याची एक बातमी अलीकडेच समोर आली होती. ते इतर कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा देण्यास तयार आहेत, परंतु सुनक यांना पंतप्रधान म्हणून त्यांना पाहायचे नाही. या बातमीनुसार बोरिस म्हणाले आहेत की, ऋषी सुनक यांच्यामुळे त्यांची पंतप्रधानपदाची खुर्ची गेली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सुनक यासाठी तयारी करत होते, असा दावाही त्यांनी केला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:09 PM 21-Jul-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here