‘त्या’ कोरोनामुक्त रुग्णाची दुसरी चाचणीही निगेटिव्ह

0

रत्नागिरी : जिल्ह्यातील शृंगारतळी येथील कोरोनाग्रस्त रुग्णाची दुसरी चाचणीही निगेटिव्ह आल्याने आता जिल्हयाच्या कोरोनामुक्ततेवर शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र, असे असले तरी अजूनही धोका टळलेला नाही. नागरिकांनी बिनधास्तपणे वावरू नये. अजूनही कोरोनाचे संकट टळलेले नाही. १४ एप्रिलपर्यंत सर्व नागरिकांनी आता अधिक खबरदारी घेतली पाहिजे. यापुढे एकही रुग्ण वाढू नयेत, असे वाटत असेल तर प्रशासनाला पूर्णपणे सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे. या रुग्णाचा दुसरा अहवाल येण्याची वाट पाहण्यात येत होती. २४ तासांतील दुसरा अहवालही निगेटिव्ह आल्याने जिल्हा निश्चिंत झाला आहे. या रुग्णाची प्रकृती सुधारली आहे. त्यामुळे या रुग्णाला घरी सोडण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
9:48 AM 01-Apr-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here