गणपतीपुळे मंदिराकडून मुख्यमंत्री निधीसाठी अकरा लाखाची मदत

0

रत्नागिरी : गणपतीपुळे मंदिर प्रशासनाने करोनाच्या पार्श्वबभूमीवर मुख्यमंत्री मदत निधीत ११ लाखाची मदत जमा केली आहे. सध्या जगभरात करोनाने धुमाकूळ घातला आहे. अत्यावश्यक बाबींसाठी नागरिकांना मदतीची गरज आहे. हे लक्षात घेऊन राज्यभरातील संस्था, देवस्थाने, कंपन्या आर्थिक मदतीसाठी सरसावल्या आहेत. कोकणातील सर्वाधिक पर्यटकांची गर्दी असलेल्या गणपतीपुळे मंदिर संस्थानाने आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. हे पैसे मुख्यमंत्री मदत निधीमध्ये त्वरित जमा करण्यात आले आहेत, अशी माहिती संस्थानचे मंदिर अध्यक्ष डॉ. विवेक भिडे यांनी दिली.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:42 AM 01-Apr-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here