श्री लक्ष्मीपल्लीनाथाचा १०४ वा चैत्रोत्सव रद्द

0

रत्नागिरी : मठ (ता. लांजा) येथील श्री लक्ष्मीपल्लीनाथाचा चैत्रोत्सव यावर्षी रद्द करण्यात आला आहे. मठ येथे येत्या ३ ते ८ एप्रिलला चैत्रोत्सव आयोजित करण्यात आला होता. मठ येथे श्री पल्लीनाथाचे मंदिर बांधण्यात आल्यानंतर तेथे दरवर्षी उत्सव साजरा केला जात आहे. यावर्षीचे उत्सवाचे पाचवे वर्ष होते. त्यानिमित्ताने ३ एप्रिल रोजी मंदिराचा वर्धापन दिन आणि त्यानंतर ४ ते ८ एप्रिल या काळात पारंपरिक पद्धतीने १०४ वा चैत्रोत्सव साजरा केला जाणार होता. मात्र करोना प्रतिबंधासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे यावर्षी चैत्रोत्सव रद्द करण्यात आला आहे..

IMG-20220514-WA0009

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:56 AM 01-Apr-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here