गावखडी सुरूबनाची समुद्राच्या पाण्याने धूप

0

रत्नागिरी : तालुक्यातील गावखडी सुरूबनाच्या परिसरात समुद्राचे पाणी मोठ्या प्रमाणात घुसत असल्याने मोठ्या प्रमाणात धूप होत आहे.

ग्रामपंचायत व वनविभागाने लक्ष न घातल्यास भविष्यात वस्तीमध्ये पाणी घुसण्याची शक्यता आहे. पूर्वीच्या काळी समुद्राचे पाणी मोठ्या प्रमाणात गावामध्ये घुसत असल्यामुळे शासनाने समुद्रकिनारी सुरूची लागवड केली. त्यामुळे कालांतराने समुद्राचे पाणी त्या भागापर्यंतच थांबल्यामुळे गावात खारेपाणी घुसण्याचा प्रश्न संपला होता. परंतु, त्यानंतर लागवडीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे समुद्राचे पाणी सुरूबनाच्या परिसरात आपटत असल्याने अनेक झाडे कोलमडून पडत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here