रत्नागिरी : करोना प्रतिबंधामुळे संचारबंदी लागू असल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीतही जिल्ह्यामधील अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थींना तीन महिन्यांचे अन्नधान्य दोन टप्प्यांमध्ये पुरविण्यात येणार आहे. एप्रिलचे धान्य तालुक्याच्या गोदामांमार्फत दुकानदारांपर्यंत पोहोच झालेले आहे. पुढील दोन महिन्यांचे धान्य तालुका गोदामांना पोहोचविण्यास सुरुवात झाली असून ते दुकानात पोहोचताच रास्त धान्य दुकानामार्फत लाभार्थींना देण्याचे काम सुरू होईल. लाभार्थींनी दुकानदाराकडून आधी एप्रिल महिन्याचे धान्य घेऊन जावे. उर्वरीत दोन महिन्यांचे धान्य एप्रिल महिन्यात रेशन दुकानात जसे पोहोच होईल त्याप्रमाणे लाभार्थींना वितरित करण्यात येईल. संबंधित रेशनकार्डधारकांनी दुकानदारांचे संपर्कात राहून शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी महेश पाटील यांनी केले आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
11:22 AM 01-Apr-20
