रत्नागिरीतील तमिळनाडूच्या विद्यार्थ्यांना लॉकडाऊनचा फटका; मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर तात्काळ दखल

0

रत्नागिरी : व्यवसाय प्रशिक्षणासाठी तामिळनाडूमधून रत्नागिरीतील मिरजोळे एमआयडीसीत आलेल्या सुमारे दोनशे विद्यार्थ्यांना लॉकडाऊनचा फटका बसला. या विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर मंगळवारी तातडीने जीवनावश्यक साहित्य पुरवण्यात आले. अत्यावश्यक साहित्य संपल्यानंतर जेवण मिळत नसल्याने विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाद्वारे थेट तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांकडे मदतीची मागणी केली. त्यानंतर तामिळनाडू मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विद्यार्थ्यांना मदत करण्याची विनंती केली. ठाकरे यांनी पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांना विद्यार्थ्यांना अत्यावश्यक साहित्य देण्याचे आदेश दिले होते. डॉ. मुंढे यांनी तात्काळ याची दखल घेत सर्व विद्यार्थ्यांची मंगळवारी जेवणाची व उर्वरित दिवसांसाठी जीवनावश्यक वस्तूंची व्यवस्था केली आहे. मात्र, या विद्यार्थ्यांना जिल्हा सोडण्याची परवानगी देण्यात येणार नसल्याचे डॉ. मुंढे यांनी स्पष्ट केले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
11:52 AM 01-Apr-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here