गोगटे कॉलेज, शिर्के हायस्कूलच्या मैदानावर केली जाणार भाजी विक्री; जिल्हा प्रशासनाचा निर्णय

0

रत्नागिरी : कोरोनामुळे लॉकडाऊन असताना जीवनावश्यक वस्तूंसाठी ग्राहकांची गैरसोय होवू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने भाजी विक्रीसाठी परवानगी दिली आहे. नाचणेतील आठवडाबाजार, शनिवार आठवडा बाजार परिसरात सुरक्षित अंतर ठेवून भाजी विक्री सुरू करण्यात आली आहे. आठवडाबाजार, नाचणे, मारूतीमंदिर येथे भाजी खरेदीसाठी जाणे शहरातील सर्वच ग्राहकांना शक्य नाही. त्यामुळे शहरामध्ये ठिकठिकाणी भाजी विक्री झोन तयार करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. एकाच ठिकाणी ग्राहकांची गर्दी होवू नये यासाठी प्रशासनाने गोगटे जोगळेकर महाविद्यालय व शिर्के हायस्कूलच्या पटांगणे ताब्यात घेतली आहे. लवकरच या मैदानावर भाजी विक्री सुरू केली जाणार आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
11:59 AM 01-Apr-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here