‘मनावर दगड ठेवून शिंदेंना मुख्यमंत्री केलं’, चंद्रकांत पाटलांच्या विधानावर शरद पवारांची खोचक प्रतिक्रिया..

0

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात पत्रकारांसोबत संवाद साधला. शरद पवार यांनी नाशिकच्या नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेवरुन केले उद्धव ठाकरेंवर केलेले आरोप, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य आणि रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार यावर भाष्य केलं. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या पनवेल येथील कार्यक्रमात मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्याचं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं. यावर पत्रकारांनी शरद पवारांना विचारलं असता दगड छातीवर ठेवायचा की डोक्यावर ठेवायचा हा त्यांचा प्रश्न असल्याचं म्हणत भाजपला टोला लगावला.

शरद पवार यांना चंद्रकात पाटील यांच्या वक्तव्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं. छातीवर दगड ठेवायचा की डोक्यावर दगड ठेवायचा हा त्यांचा प्रश्न असल्याचं शरद पवार म्हणाले. संपूर्ण सत्ता केंद्रीत करुन ठेवत दोघांनी सरकार चालवायचं ठरवल्याचं दिसतंय. ते सत्ताधारी आहेत ते काय करतात करु द्या, आम्ही विरोधी पक्षात आहोत, असं शरद पवार म्हणाले.

एकनाथ शिंदेंच्या सुरक्षा वादावर भाष्य

सुरक्षा कुणाला द्यायची याची चर्चा कॅबिनेटमध्ये होत नाही. मुख्य सचिव, गृहसचिव, डीजी होम या वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती असते. त्यांच्या बैठकीत याबाबत निर्णय होतो. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मला सांगितलं की त्यांना झेड दर्जाची सुरक्षा होती. गडचिरोलीचे पालकमंत्री असल्यानं त्यांना अधिकची सुरक्षा दिली होती, असंही दिलीप वळसे पाटील यांनी सांगितल्याची माहिती शरद पवारांनी दिली.

नितेश राणे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंवर केलेल्या आरोपाबद्दल विचारलं असता शरद पवारांनी पोराबाळांच्या वक्तव्यावर मी प्रतिक्रिया देण योग्य नाही, असं म्हटलं.

डॉ. श्रीमंत कोकाटे लिखित शिवचरित्र आणि विचारप्रवाह ग्रंथाचे प्रकाशन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाहू महाराज होते. डॉ. कोकाटे, डॉ. जयसिंगराव पवार, माजी न्यायमूर्ती बी. जी.कोळसे पाटील आदी उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर शरद पवार बोलत होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
1:34 PM 23-Jul-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here