टी-20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघ दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाशी भिडणार

0

ऑस्ट्रेलियात येत्या ऑक्टोबर महिन्यापासून आगामी टी-20 विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. यापूर्वी भारतीय संघ (Team India) दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि ऑस्ट्रेलियाचं (Australia) यजमानपद भूषवणार आहे.

या मोठ्या स्पर्धेपूर्वी भारतीय संघ या दोन संघांसोबत टी-20 मालिका खेळणार आहे, अशी माहिती बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी केलीय. संयुक्त अरब अमिरातीमध्ये गेल्या वर्षी पार पडलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतानं निराशाजक कमागिरी केली होती. दरम्यान, पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून पराभव पत्कारावा लागल्यानंतर भारताला या स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं होतं.

सौरव गांगुली काय म्हणाले?
बीसीसीआयच्या अपेक्स काऊन्सिलच्या बैठकीनंतर सौरव गांगुली म्हणाले की, “दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याच वेळापत्रक अद्याप निश्चित झालेलं नाही. टी-20 विश्वचषकापूर्वी भारत दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाशी तीन सामन्यांची टी-20 टी-20 मालिका खेळणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ सप्टेंबरमध्ये इंग्लंड दौरा करून भारतात दाखल होईल”, असं सौरव गांगुलीनं म्हटलंय.

2021 नंतर प्रथमच ऑस्ट्रेलियाशी द्विपक्षीय मालिका खेळणार
आयपीएलनंतर भारतानं मायभूमीवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळली होती. या मालिकेतील पहिले दोन सामने गमवल्यानंतर भारतानं पुढील दोन सामन्यात जबरदस्त कामगिरी करत मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली. परंतु, या मालिकेतील अखेरचा आणि निर्णायक सामना पावसामुळं रद्द करण्यात आला. भारतीय संघ जानेवारी 2021 नंतर प्रथमच ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिली द्विपक्षीय मालिका खेळणार आहे.

भारतीय संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर
सध्या भारतीय संघ वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय आणि पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना काल खेळण्यात आला. या सामन्यात 3 धावांनी विजय मिळवून भारतानं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. एकदिवसीय मालिकेनंतर भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात टी-20 मालिका खेळली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here