मरकज येथे रत्नागिरी शहरातील दोघांची उपस्थिती

0

➡ इतरांचा तपास पोलिसांकडून सुरु

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी : निजामुद्दीन मरकज येथे जवळपास २००० लोक धार्मिक कार्यासाठी जमले होते. त्यापैकी बरेच जण परदेशातून देखील आले होते ज्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. या लोकांच्या संपर्कात आल्यामुळे इतरांनाही कोरोनाची लागण झाली आहे. धक्कादायक म्हणजे या धार्मिक कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्ह्यातील ८ ते १० जण तर रत्नागिरी शहरातुन दोघेजण गेले होते. रत्नागिरी जिल्ह्यातून या कार्यक्रमासाठी गेलेल्यांचा शोध पोलिसांकडून सुरु आहे. रत्नागिरी शहरातील दोघे ७ तारीखला दिल्लीत निजामुद्दीन येथे पोहचले. ७ ते १० मार्च पर्यंत हे दोघे मरकज येथे थांबले. १२ मार्चला ते दोघे दिल्लीतून अहमदनगर येथे आले. अहमदनगर येथून १३ मार्चला हे दोघे रत्नागिरीत दाखल झाले. या दोघांचा मंगळवारी शोध घेण्यात आला असून यांची वैद्यकीय तपासणी सुरू आहे. या दोघांसह इतर तालुक्यातील तहसीलदारांकडून पोलिसांच्या मदतीने या सगळ्यांचा शोध सुरु आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
2:00 PM 01-Apr-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here