गुहागर तालुका चर्मकार विकास संघाचे महावितरणला स्ट्रीट लाईट बाबत निवेदन

0

गुहागर : गुहागर तालुका चर्मकार विकास संघाचे अध्यक्ष विनोद जानवळकर यांनी जानवळे येथील विशेष मागास घटक योजनेतील स्ट्रीट लाईटच्या कामाबद्दल महावितरणच्या उपअभियंतांना निवेदन दिले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, महावितरण कार्यालयाकडे या विषयासंदर्भात दि. ९ ऑगस्ट २०१९ रोजी पत्र देण्यात आले होते. त्यानुसार महावितरणने कार्यवाहीचा आदेश काढल्याप्रमाणे ठेकेदाराने फक्त विद्युत खांब उभे करून विद्युत वाहिन्या जोडल्या आहेत. त्या विद्युत खांबांवर अद्याप दिवे लावलेले नाहीत. याचे काम पूर्ण झाले की नाही, हे स्थानिक ग्रामपंचायतीतही कळविलेले नाही. त्यामुळे गावातील मागास वस्त्या अद्याप अंधारात आहेत. तरी १५ ऑगस्टपूर्वी दिवे लावले गेले पाहिजेत, याकडे लक्ष द्यावे, असे निवेदनात म्हटले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:16 PM 25-Jul-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here