अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल या दोघांना सोशल मीडियावर एका अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
कतरिनाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मित्रमैत्रिणींसोबत हे दोघं नुकतेच मालदिवला गेले होते. मालदिव व्हेकेशनचे बरेच फोटो आणि व्हीडीओ ते गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. त्यांना सोशल मीडियावर धमकी देण्यात आली आहे.
याप्रकरणी सांताक्रूझ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदित्य राजपूत नावाचा एक व्यक्ती गेल्या काही दिवसांपासून कतरिनाला स्टॉक करत होता. विकीने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यानंतरही तो कतरिनाला स्टॉक करत होता. अखेर विकीने त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
1:30 PM 25-Jul-22
