लांजा : तालुक्यातील मठ येथील यशवंत कदम यांच्या मालकीच्या स्वप्नील नर्सरी येथील विहिरीत पूजा प्रदीप पालये (२५) या विवाहितेने सोमवारी दुपारी २ च्या सुमारास उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान ही आत्महत्या की घातपात? याविषयी उलटसुलट चर्चा सुरू आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, असोडे येथील पूजा प्रदीप पालये ही विवाहिता मठ येथील स्वप्नील नर्सरी येथे मजुरीच्या कामाला नियमित येत होती. सोमवारी दुपारी जेवणाच्या सुट्टीच्या वेळी पूजा अचानक गायब झाली. मात्र बराच वेळ झाला तरी आली नाही म्हणून सोबतच्या अन्य कामगारांनी शोधाशोध केली. मात्र ती सापडली नाही. अधिक शोध घेतला असता ती महिला विहिरीत तरंगताना दिसून आली. याबाबत असोडेचे पोलिस पाटील मंगेश लोकम यांनी लांजा पोलिस यांना खबर दिली. पूजा हिचा विवाह वर्षभरापूर्वीच असोडे येथील प्रदीप प्रभाकर पालये याच्यासोबत झाला होता. मात्र या आत्महत्येचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक दिलीप पवार, श्री. कांबळे हे करीत आहेत
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
3:30 PM 01-Apr-20
