कांदळवन प्रतिष्ठान पुरस्कार सोहळ्यात स्वस्तिक गावडे आणि शुभम भाटकर यांना उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पारितोषिक

0

मुंबई : आंतरराष्ट्रीय कांदळवन परिसंस्था संवर्धन दिनानिमित्त मुंबई येथे कांदळवन कक्ष व कांदळवन प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कांदळवन प्रतिष्ठान पुरस्कार 2022 सोहळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. ह्या पुरस्कार सोहळ्यामध्ये कांदळवन कक्ष, रत्नागिरी येथे प्रकल्प समन्वयक म्हणून काम करणाऱ्या श्री. स्वस्तिक गणपत गावडे ह्यांना कांदळवन संवर्धन कार्यात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल द्वितीय पारितोषिक मिळाले तसेच श्री. शुभम विकास भाटकर ह्यांना तृतीय पारितोषिक प्राप्त झाले.

श्री स्वस्तिक गावडे हे प्रकल्प समन्वयक – वन म्हणून कांदळवन कक्ष, रत्नागिरी अंतर्गत रत्नागिरी, लांजा, राजापूर ह्या तालुक्यांचे कांदळवन संवर्धनाचे काम पाहत असून कांदळवन वनीकरण, पावस कांदळवन निसर्ग पर्यटन मधील महिलांचे क्षमता बांधणी ट्रेनिंग व राजापूर तालुक्यातील जांशी गावातील महिलांच्या मदतीने कोरोना काळात हाती रंगवलेले मास्क विकून ह्या महिलांना सुमारे रुपये 95,000 इतके उत्पन्न मिळवून दिले.

श्री. शुभम विकास भाटकर हे प्रकल्प समन्वयक – मत्स्य म्हणून कांदळवन कक्ष, रत्नागिरी अंतर्गत अणसुरे, सागवे ह्या गावाचे काम पाहतात व ह्या गावात पिंजऱ्यातील मत्स्य पालन (जिताडा व काळूनदर), कालवे पालन व काकई पालन हे प्रकल्प गेली 2 वर्ष यशस्वीरीत्या राबवत असून कांदळवन संवर्धन व उपजीविका निर्माण योजना लाभार्थींना सुमार रुपये 3 लाख 16 हजार इतके उत्पन्न मिळवून दिले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:04 AM 27-Jul-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here