क्रेडिट कार्डद्वारे बँकेची पावणेनऊ लाख रुपयांची फसवणूक

0

रत्नागिरी : मोबाईल लिंकद्वारे रत्नागिरीतील फेडरल बँकेत खाते असलेल्या महिलेच्या नावाचे परस्पर क्रेडिट कार्ड मिळवून वेळोवेळी पैसे काढून सुमारे ८ लाख ८५ हजार २९ रुपयांच्या ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे.

याप्रकरणी लातूर येथील अज्ञाताविरोधात शहर पोलिस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २५ मार्च २०२२ ते १४ जून २०२२ या कालावधीत मारुती मंदिर येथील फेडरल बँकेच्या शाखेत घडली आहे.

या बाबत फेडरल बँकेच्या शाखेचे व्यवस्थापक समित विश्वनाथ बागडिया (३५, रा. आरोग्य मंदिर, रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार त्यांच्या बँकेत सायली सचिन पाटील (रा. चिंचखरी, रत्नागिरी) यांचे खाते आहे. त्यांच्या खात्याला लिंक असलेला मोबाईल क्रमांक हा सध्या लातूर येथील अज्ञात व्यक्ती वापरत आहे. त्याव्दारे त्याने सायली पाटील यांच्या नावाच्या क्रेडिट कार्ड लिंकव्दारे पत्ता बदलून तो स्वतःचा लातूर येथील अशोक हॉटेल, अमृता ट्रॅव्हल्स असा केला. तसेच त्याने सायली पाटील यांचे खाते असलेल्या फेडरल बँकेकडे मोबाईल लिंकव्दारे मागणी करुन सायली पाटील यांच्या नावाचे क्रेडिट कार्ड प्राप्त केले. त्या नंतर वेळोवेळी लातूर येथे एकूण ८ लाख ८५ हजार इतकी रक्कम काढून अपहार करत बँकेची फसवणूक केली. या प्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक आकाश साळुखे करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:19 AM 27-Jul-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here