रत्नागिरी जिल्ह्यात आलेला पूर आणि अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील जनजीवन ठप्प होत आहे. पुरामुळे पेट्रोल डीझेलचे टैंकर न आल्यामुळे रत्नागिरीत इंधन टंचाई निर्माण झाली आहे. गॅस सिलेंडरचीही टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. आज सकाळपासून भल्या मोठ्या रांगा पेट्रोल पंपासमोर लागलेल्या दिसत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात येणारे रस्तेमार्ग बंद झाल्यामुळे दुध आणि भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण झाला आहे.
जगबुडी, नारिंगी, वशिष्ठी, शिवनदी, अर्जुना, कोदवली या नद्यांना आलेल्या पुरामुळे जिल्ह्यातील रस्तेमार्ग ठप्प झाले. जगबुडी पुल आणि बहादुरशेख पुलावरची वाहतूक ठप्प झाल्याने मुंबईशी संपर्क तुटत आहे.आंबा घाटात दरड कोसळल्याने कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्राशी संपर्क तुटला आहे.सिंधुदुर्गातही पुरस्थिती असल्याने जनजीवन ठप्प झाले आहे. पुरामुळे पेट्रोल-डिजेलचे टॅकर रत्नागिरीत पोहचू शकलेले नाहीत त्यामुळे अनेक पंपातील इंधन संपले असून इंधन टंचाई निर्माण झाली आहे.पश्चिम महाराष्ट्रातील पुरस्थितीमुळे दुध आणि भाजीपालाचा तुटवडा निर्माण झाला आहे.
