लॉकडाऊनमध्येही पूर्ण पगार मिळणार; एस टी कर्मचाऱ्यांना दिलासा

0

रत्नागिरी : राज्यात २५० आगार, १८ हजार एसटी बसेस आणि एक लाख सात हजार कर्मचारी आहेत. या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. एक लाख सात हजार कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा पूर्ण पगार देण्यात येणार आहे. या निर्णयाचे रत्नागिरीतील कामगार संघटनांनी स्वागत केले आहे. २१ दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये एसटी बसेसही बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार काढायचा कसा? असा प्रश्न उपस्थित झाला होता; पण यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तोडगा काढला.

IMG-20220514-WA0009

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
5:56 PM 01-Apr-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here