वादळ आलं तरी आमचं सरकार हलणार नाही : एकनाथ शिंदे

0

मुंबई : “शिंदे-फडणवीस सरकार कसं आलं हे सर्वांनाच माहिती आहे. कितीही वादळ आलं तरी आमचं सरकार हलणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

आंतरराष्ट्रीय कांदळवन परिसंस्था संवर्धन दिन आणि कांदळवन प्रतिष्ठान पुरस्कार वितरणाचा मुंबईतील सह्याद्री गेस्ट हाऊस येथे कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “कांदळवनाला दुर्दैवाने जितकं महत्व दिलं जावं तितकं महत्व दिलं जात नाही. कांदळवन हे चांगलं काम करतं, ते फार महत्वाचं आहेत. आमचं सरकार देखील तसंच आहे.

सरकार कसं आलं हे सर्वांनाचं माहिती आहे. हे सरकार देखील वादळ आलं तरी हलणार नाही.”
“कांदळवनाबाबत आपण जागृत राहून संवर्धन केलं पाहिजे. आपण योग्य ती काळजी घेतोय, जेणेकरून कांदळवन वढतील. कांदळवन विभाग निर्माण करणारं देशातील महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. कांदळवन हे आरक्षित करण्याचं काम करण्यात येईल. आपली ही वन संपदा आहे, ती जपायला हंवी, असे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलं.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “कांदळवनाचे महत्व आपल्या किनारपट्टीसाठी महत्वाचे आहे. गेल्या वर्षी आलेल्या निसर्ग वादळाने सर्वत्र नुकसान झालं, मात्र ज्या ठिकाणी कांदळवन होते तेथे झाले नाही. आपल्या कांदळवन विभागाने गेल्या काही वर्षात चांगलं काम केलं आहे. कांदळवन संवर्धन आणि वन्य जीव संवर्धन यात लोकसहभाग देखील वाढलाय. जे काही निसर्गानं दिलय त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. नवं सरकार देखील पर्यावरणा संदर्भात चांगलं काम आणि योजना राबवेल. आमचं सरकार देखील कांदळवन आहे. ज्या प्रमाणे कांदळवन सर्व परिस्थिती उभे असते, तसंच हे सरकार देखील उभं आहे.”

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:50 PM 27-Jul-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here