बच्चू कडूंनी ‘शिवसेना पक्षप्रमुख’ म्हणत उद्धव ठाकरेंना दिल्या शुभेच्छा

0

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा ६२ वा वाढदिवस आहे.

उद्धव ठाकरे यांचा यंदाचा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा होत आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते उद्धव ठाकरेंच्या भेटी घेत आहेत. गावाखेड्यातील शिवसैनिक सोशल मीडियातून शुभेच्छा देत आहे. तर, राजकीय पक्षाचे नेतेही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसून येतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. तर, माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनीही शिवसेना पक्षप्रमुख म्हणत उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला शिवसैनिकांसह सामान्य नागरिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर ‘मातोश्री’ निवासस्थानी येतात. उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी ‘मातोश्री’बाहेर रांगा लागतात. यातच आता शिवसैनिकांकडून रात्री १ वाजता उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे जोरदार सेलिब्रेशन करण्यात आले. त्यानंतर, शुभेच्छांचा ओघ सुरूच आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, त्यांनी दिलेल्या शुभेच्छा संदेशमध्ये शिवसेना पक्षप्रमुख हा शब्द जाणीवपूर्वक टाळला असल्याचे दिसून येत आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
3:14 PM 27-Jul-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here