एचआयव्ही रूग्णांना औषधासाठी संचारबंदीतून मुभा; अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांचे आदेश

0

रत्नागिरी : एचआयव्ही बाधित रूग्णांना दर महिन्यात ठरवून देण्यात आलेल्या दिवशी औषधाकरीता ग्रामीण रुग्णालय अथवा जिल्हा शासकीय रूग्णालयात जावे लागते. टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी पोलीस या रूग्णांना अडवत होते, परंतु अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी जिह्यातील पोलीस स्थानक प्रमुखांना रूग्णांना औषधोपचारासाठी सोडावे असे आदेश दिले आहेत.रत्नागिरी जिह्यात एचआयव्हीग्रस्त रूग्ण अनेक ठिकाणी आहेत. वेगवेगळ्या उत्पन्न गटातील या रूग्णांना औषधोपचाराची योग्य सोय सार्वजनिक आरोग्य विभागाने केली आहे. सर्व ठिकाणची ग्रामीण रूग्णालये आणि शासकीय रूग्णालयात या रूग्णांवर औषधोपचार केले जातात. दर महिन्यातून एकदा या रूग्णांना ठरवून दिलेल्या तारखेला औषध नेण्यासाठी रूग्णालयात जावे लागते. संचारबंदी सुरु झाल्यानंतर रूग्णांना औषध मिळवणे जिकरीचे झाले होते. पोलीस अनेक ठिकाणी अटकाव करत होते. पोफळीतून कामथे रूग्णालय येथे जाणाऱया रूग्णांना चिपळुणात अडवण्यात आले. याची गंभीर दखल जिल्हा पोलीस प्रशासनाने घेतली. अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी जिह्यातील सर्व पोलीस स्थानक प्रमुखांना सूचना दिली आहे की, ज्या लोकांकडे एचआयव्ही उपचारांकरीता अधिकृत ग्रीन कार्ड असेल अशा सर्व रूग्णांना उपचारासाठी रूग्णालयात जावू द्यावे. अशा रूग्णांना कोणतीही अडचण आल्यास त्यांनी पोलीस हेल्पलाईनवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

IMG-20220514-WA0009

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
6:14 PM 01-Apr-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here