‘रामदास कदम कालपर्यंत मराठा नव्हते का..?’

0

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यासोबत जसजशी नेत्यांची साथ वाढत चालली आहे. तस तशी उद्धव ठाकरे यांच्यावरील टीकाही आहे वाढत चालली आहे.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी गेल्या काही दिवसात अनेक गौप्यस्फोट करत. अनेक सवाल उद्धव ठाकरे यांना केले आहेत. तर मराठा नेत्यांना मोठे होऊ द्यायचं नाही का? असा प्रश्न उपस्थित करतनाही रामदास कदम हे दिसून आले. त्यावरून आता ठाकरे घरातले शिवसेना नेते पेटून उठले आहेत. खासदार संजय जाधव यांनी आता रामदास कदम यांना तुम्ही कालपर्यंत मराठा नव्हते का? असे म्हणत थेट सवाल केला आहे. तसेच त्यांनी गेल्या काही वर्षातील शिवसेनेच्या जातीय राजकारणावरूनही भाष्य केलं आहे.

याबाबत बोलताना संजय जाधव म्हणाले, रामदास कदम कालपर्यंत मराठा नव्हते का ? आताचं तुम्हाला मराठा आठवला का.? असे अनेक सवाल त्यांनी रामदास कदमांना केले आहेत. तर बाळासाहेब ठाकरेंनी कधीच जात पात पाहून राजकारण केलं नाही. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या दिवशी अशी टिका करणं संस्कृतीला शोभतं का ? असेही सवाल त्यांनी केला आहे. तर एकनाथ शिंदेंनी पक्ष प्रमुख म्हटलं काय आणि नाही म्हटलं काय आम्हाला काही फरक पडत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या शुभेच्छाही सध्या चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. त्यावर आता जोरदार प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

उद्धव ठाकरे हे पक्ष प्रमुख आहेत आणि उद्याही राहतील, असेही जाधवांनी स्पष्ट केलं आहे. तर तुम्ही मुख्यमंत्री झालात हे बाळासाहेब ठाकरेंमुळेच ना? बाळासाहेब ठाकरे आमचे गुरु होते. त्यांचा मुलगा हा गादीवर बसला म्हणजे तो आमच्यासाठी गुरु आणि आदित्य ठाकरे तर नातू आहेत, असेही जाधव म्हणाले आहेत. यात क्रेडीट घेण्याचा विषय आला कुठे? तुम्ही बोलताना जरा मर्यादा पाळा. भविष्यात शिवसेनेला चांगले दिवस येतील शिवसेना दुपटीने उभी राहणार असा टोला त्यांनी नारायण राणेंना लगावला आहे. तर हे सरकार कायद्यात अडकलंय त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार होत नाही, असेही ते म्हणाले आहेत. तसेच त्यांनी वाढदिवसाच्या उद्धव ठाकरेंना शुभेच्छाही दिल्या आहे. ठाकरेंवर आज सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
3:58 PM 27-Jul-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here