जल जीवन मिशन अंतर्गत ‘हर घर जल उत्सव’

0

रत्नागिरी : जल जीवन मिशन अंतर्गत २५ जुलै ते १२ ऑगस्टपर्यंत ‘हर घर जल उत्सव’ विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. यामध्ये विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. जल जीवन मिशन हा केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. या कार्यक्रमा अंतर्गत २०२४ पर्यंत प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. या योजनेत १०० टक्के वैयक्तिक व संस्थात्मक नळ जोडणी पूर्ण करणार्‍या गावांसाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे.

विशेष ग्रामसभांचे आयोजन करणे, ग्रामसभांमध्ये ग्रामपंचायत हर घर जल’ घोषित करणे बाबतचा ठराव करणे, त्यानंतर गावात समारंभ घेऊन हर घर जल उत्सव’ साजरा करणे, विद्यार्थ्यांची रॅली काढणे, जनजागृतीसाठी पथनाटयांचे आयोजन करणे, लोककलांचा वापर करुन जनजागृती करणे, पाणी गुणवत्ता तपासणीसाठी विशेष मोहीम राबवणे, हर घर जल’ उत्सवामध्ये गावातील पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ, शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र आदी घटकांना सहभागी करुन घेणे. संस्थात्मक नळ जोडणीमध्ये ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र, सार्वजनिक ठिकाणी नळ जोडणी देणे आदी उपक्रम राबवण्यात येणार आहेत. सर्वांनी हर घर जल’ उत्सवात सहभागी व्हावे असे आावाहन कार्यकारी अभियंता (ग्रापापु) श्रीम.मयुरी पाटील तसेच पाणी व स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक, जल जीवन मिशन तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई यांनी केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
6:08 PM 27-Jul-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here