दिव्यांग तरुणाला चिपळूण रोटरी क्लबकडून कृत्रिम हातपाय

0

चिपळूण : रेल्वे अपघातात हात आणि पाय तुटल्याने अपंग झालेल्या संजय ठाकरे या तरुणाला चिपळूण रोटरी क्लबने कृत्रिम हात आणि पाय बसवून दिला. त्यामुळे त्यांचे जीवन सुसह्य झाले आहे.

संजय रमेश ठाकरे (वय २७ वर्षे) हा मूळचा देवास (मध्य प्रदेश) येथील रहिवासी व्यवसायानिमित्त रत्नागिरीत राहत होता. रेल्वेतून प्रवास करताना पनवेल येथे त्यांचा अपघात झाला. या अपघातात त्यांचा डावा हात कोपरापासून, तर डावा पाय गुडघ्यापासून काढावा लागला. मुंबईत सायन रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर अपंग अवस्थेत उदरनिर्वाह करणे त्यांना जड जात होते.

रत्नागिरीजवळच्या माहेर या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून ही समस्या रत्नागिरी रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष विजय पवार यांच्यापर्यंत पोहोचली. चिपळूण रोटरी क्लबने आयोजित केलेल्या एका शिबिरामध्ये संजय ठाकरे यांना ते स्वतः घेऊन गेले. त्यासाठी त्यांना रेल्वे पोलीस पीएसआय सौ. प्रतिभा साळुंखे यांची मदत मिळाली. चिपळूण रोटरी क्लबने संजय ठाकरे यांना कृत्रिम हात आणि पाय बसवून दिला. त्यामुळे ठाकरे आता स्वतः उभे राहतात, काठीच्या आधाराने चालू शकतात. रत्नागिरी रोटरी क्लबचे नूतन अध्यक्ष राजेंद्र घाग यांनी या अपंग तरुणाला रोटरी क्लबतर्फे व्हीलचेअर दिली आणि त्यांना रोजगार मिळवून देण्याची ग्वाही दिली. रोटरी डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी किशोर लुल्ला यांनी रत्नागिरी क्लबच्या सर्व रोटरी सदस्यांचे कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here