गिरीश महाजनांनी घेतली अमित शाहांची भेट, मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग?

0

मुंबई : राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराच्या हलचालींना वेग आल्याचं दिसतंय. भाजप नेते गिरीश महाजन यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.

महाजन यांच्या दिल्ली वारीनंतर पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराल वेग आलाय. राज्यात शिंदे-फडणवीसांचं सरकार एकूण 26 दिवस उलटून गेले आहेत. तरीही राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. दुसरीकडे भाजप नेते गिरीश महाजन आणि शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार हे दिल्लीत पोहोचले आहेत.

सत्तार आणि महाजन हे चांगलं मंत्रिपद मिळावं म्हणून लॉबिंग करत असल्याचं सांगितलं जात आहे. महाजन यांनी तर काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा केल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं असलं तरी फडणवीस यांना अजूनही कोणतंच खातं देण्यात आलेलं नाही. त्यामुळे महिना होत आला तरी शिंदे सरकारात फडणवीस बिनखात्याचेच मंत्री आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:53 AM 29-Jul-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here