मन से रावण जो निकाले, राम उसके मन में हैं…

0

आज रामनवमी, पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल नेटवर्क वर शुभेच्छा देत आपण सर्वांनी साजरी केली. पाश्चात्य संस्कृती आणि भारतीय संस्कृती याचा उत्तम मिलाफ आपल्यात आढळतो. मुळात दिवस साजरे करण आणि एकमेकाला त्या दिवसाच्या शुभेच्छा देण आपल्या संस्कृतीत नाही तरीही…चांगभल ! मध्यंतरी ‘स्वदेश’ नावाचा एक हिंदी चित्रपट आला होता, त्यात पल पल है भारी वो विपदा है आई या गीतात गीतकार जावेद अख्तर यांनी फार सुंदर ओळी लिहून ठेवल्यात.

राम तेरे मन में हैं, राम तो घर घर में हैं, राम हर आँगन में हैं, मन से रावण जो निकाले, राम उसके मन में हैं…

रामायणातून मनुष्याने आपल्या जीवनाचा अर्थ शोधावा आणि बोध घ्यावा आणि त्यानुसार आपले जीवन व्यतीत करावे; अर्थात संपूर्ण रामायण म्हणजे आपल्याला जगण्यासाठी उपलब्ध असणारी मार्गदर्शिकाच आहे. आपले जीवन प्रेम, बंधुत्व, समरसता, भक्ती, सेवा, त्याग यांनी सजावे याचा बोध देणारे रामायण हे महाकाव्य आहे. पण यासाठी आपल्यात असणारे रावणरुपी विकार स्वतः राम बनून काढून टाकणं गरजेचे आहे याची आठवण करून देण्यासाठीच हा उत्सव हा दिवस जणू काही आपल्यावरील एक संस्कार आहे.

हेमंत वणजु
संपादक : रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
02:44 PM 02/Apr/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here