रत्नागिरी : सध्या संपूर्ण देशात कोरोना विषाणू धुमाकूळ घालत असताना शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार प्रत्येक सामान्य नागरिक घरी बसुन शासनाला सहकार्य करत असताना आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाग्रस्त रुग्णाची सेवा करणारे डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉय तसेच शासकीय अधिकारी, तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी व पोलीस यंत्रणा ह्यांचेसाठी जिल्हा आरोग्य रुग्णालय रत्नागिरी, राजापूर तहसीलदार, प्राथमिक आरोग्य केंद्र राजापूर, ग्रामीण रुग्णालय राजापूर, पंचायत समिती राजापूर, लांजा तहसीलदार, प्राथमिक आरोग्य केंद्र लांजा, ग्रामीण रुग्णालय लांजा, पंचायत समिती लांजा, महावितरण कंपनी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र साखरपा यांनी कोरोना तपासणी किट, मास्क तसेच हॅन्ड सॅनिटीझर या साहित्याची मागणी राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजनजी साळवी ह्यांच्या कडे केली असता साळवी यांनी तात्काळ आपल्या स्थानिक विकास आमदार निधी मधून ५० लाख रुपये किमतीचे साहित्य खरेदी व मतदारसंघासाठी ४ व्हेंटिलेटर खरेदी करण्याबाबतचे पत्र जिल्हा नियोजन अधिकारी, रत्नागिरी यांच्याकडे देऊन साहित्य खरेदी करण्याबाबत सूचित केले आहे.
