खा. विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. बाळा कदम आणि टीमकडून गरजूना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

0

चिपळूण : लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असलेल्या व्यक्तींचे हाल झाले आहेत अशा व्यक्तींसाठी शिवसेनेने मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. हातावर पोट असलेल्या व्यक्तींची लॉकडाऊनच्या काळात उपासमार होऊ नये याकरिता चिपळूणात शिवसेनेने जीवनावश्यक वस्तूंचे गरजू लोकांना मोफत वाटप सुरु केले आहे. खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शाखा वडनाका चिपळूण विधानसभा क्षेत्र प्रमुख बाळा कदम यांनी हा उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. बाळा कदम यांनी मदतीकरिता एक टीम तयार केली आहे. ही टिम जीवनावश्यक वस्तूंचे पॅकिंग करून वाटपाचे काम करत आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:35 AM 02-Apr-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here