हातखंबा ग्रामपंचायतीच्या वतीने सॅनिटायझरचे वाटप

0

रत्नागिरी : हातखंबा ग्रामपंचायतीच्या वतीने हँड सॅनिटायझरचे वाटप घरोघरी जाऊन करण्यात आले. त्याचप्रमाणे गावातील ग्रामस्थांना भाजीपाल्याचा तटवडा भासु नये म्हणून त्यांनी भाजी विक्रेत्यांशी संपर्क साधून शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वाडीवस्त्यांमध्ये औषध फवारणी करण्याचे काम सुरू आहे. अंगणवाडी सेविका, आशा सेविका तसेच ग्राम कृती दलातील सदस्य आणि समीर सनगरे व नरेंद्र सनगरे, विलास बोंबले या युवकांनी यासाठी परिश्रम घेतले. सरपंच विद्या बोंबले व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा उपक्रम राबवला.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
11:07 AM 02-Apr-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here