कोर्ले-देवगड एस.टी. मालपेत अडकली

0

देवगड : देवगड तालुक्यात वादळी वाऱ्सयाह मुसळधार पावसाचा जोर कायम असून, यामुळे कोर्ले, धालवली, मालपे या भागात पूरसदृश स्थिती आहे. खारेपाटण खाडीला आलेल्या पुराचा फटका एस.टी.ला बसला, कोलें-देवगड एस.टी. मालपे येथे पुरात अडकली आहे. पूर न ओसरल्याने गाडी दोन दिवस अडकून पडली आहे. देवगडमध्ये वादळी वा-यासह जोरदार पाऊस पडत असल्याने धालवली, कोर्ले, पोंभुले, मालपे या भागाला पुराचा तडाखा बसला आहे. रविवारी रात्री कोर्ले वस्तीची गेलेली कोर्ले -देवगड ही गाडी सोमवारी पहाटे ५.३० वा. कोर्ले येथून सुटून देवगडकडे येत असताना सकाळी ६ वा. सुमरास मालपे-गावठण येथे रस्त्यावर दुचाकीस्वारीला बाजू देत असतानाच गाडी एका बाजुला मातीत रूतली. दरम्यान खाडीचे पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने गाड़ी पुरात अडकली. चालक डी.आर.साटम यांनी एका बाजुला मतीत रूतलेली गाडी काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यामध्ये त्यांना यश आले नाही. पुराच्या पाण्याचा प्रवाह वाढत जावून एसटीला पाण्याने पूर्णत: वेढले. एसटीतील प्रवाशांना तात्काळ बाहेर काढण्यात आले.सकाळच्या सत्रात पुराचे पाणी वाढत गेल्याने मालपे रस्ता पाण्याखाली गेला.LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here