खारवी समाज पतसंस्थेला पहिल्याच आर्थिक वर्षात ९ लाखांचा नफा

0

रत्नागिरी : येथील खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेला पहिल्याच आर्थिक वर्षात नऊ लाख नऊ हजारांचा मात्र नफा मिळाला आहे. संस्थेने ५८ लाखांचे भागभांडवल आणि तीन हजार २४८ सभासद एवढ्या आर्थिक बळावर गेल्या वर्षभरात ही प्रगती केली आहे, असे अध्यक्ष कमलाकर हेदवकर यांनी सांगितले. ते म्हणाले, गेल्या वर्षभरात संस्थेला खूप संघर्ष करावा लागला. आम्हाला सतत जबाबदारीचा दबाव अनुभवाला आला. आर्थिक निर्णयात तसूभर चूक चालत नाही. अचूक वेळ साधावी लागत आहे. कर्ज मागणी, वितरण आणि नियमित वसुली हे चक्र सांभाळण्याची कसरत गेले वर्षभर करत असतानाच शंभर टक्के वसुलीची निश्चिती केली होती. त्याला यश आले. खारवी समाजाचे नाव अभिमानाने मिरवावे, अशीच ही वाटचाल आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
11:23 AM 02-Apr-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here