रत्नागिरी : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या दोन धरणांपैकी पानवल धरण १९६३ च्य सुमारास बांधलेल्या या धरणातून रत्नागिरी शहराला ग्रॅव्हीटीने पाणी पुरवठा होतो. पूर्वीच्या इंजिनिअरनी दूरदृष्टीने शहरातील पाण्याची गरज भागवण्यासाठी निर्माण केलेले हे धरण. आज देखील जवळजवळ अर्ध्या शहराची तहान पानवल धरणातून भागविली जाते. अशा या धरणाची देखरेख करण्यसाठी ठेवण्यात आलेल्या कर्मचार्यांसाठी बांधण्यात आलेल्या रूमची अत्यंत दुरवस्था झाली आहे. या इमारतीचा स्लॅबला गळती लागली असून तो कधीही पडण्याची शक्यता आहे. हातखंबा पासून सुमारे दोन किलोमीटर चालत जाऊन येथे कर्मचाऱ्यांना जावे लागते. दिवसभर येथे कामावर असताना व्यवस्थित बसण्यासाठी देखील येथे जागा नसल्याचे दिसून येते. विकास कामांवर लाखो रुपये खर्च करणाऱ्या रत्नागिरी नगरपालिकेने कामगारांच्या सोयीसुविधांकडे देखील पाहावे अशी मागणी होत आहे.
