रत्नागिरी शहरातून बेपत्ता झालेला अल्पवयीन मुलगा सापडला पंढरपूरात

0

रत्नागिरी : काही दिवसांपूर्वी रत्नागिरी शहरातून बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलाला शहर पोलिसांच्या पथकाने पंढरपूर येथून शोधून आणले. घरातून सकाळी बाहेर जातो असे सांगून निघून गेलेल्या मुलाबाबत शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताने फूस लावून पळवून नेल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानंतर पोलिसांना तांत्रिक व खबर्‍यांकडून मिळालेल्या माहीतीच्या आधारे हा मुलगा पंढरपूर येथे असल्याची माहीती मिळाली. त्याआधारे शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथक पंढरपूला रवाना झाले होते. पोलिसांचे हे पथक पंढपरपूर गेल्यानंतर त्याठिकाणी त्या अल्पवयीन मुलासोबत त्यांना सांगली येथील एक अल्पवयीन मुलगीसुध्दा मिळून आली. या दोघांनाही शहर पोलिसांनी शनिवारी रत्नागिरीत आणले.

ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहीतकुमार गर्ग, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, पोलीस उपनिरीक्षक शांताराम महाले, पोलीस हेडकॉन्स्टेबल विलास जाधव, प्रसाद घोसाळे, पोलीस नाईक वैभव नार्वेकर, अमित पालवे, चालक विशाल आलीम यांनी केली.

बेपत्ता अल्पवयीन मुलाला शोधून आणल्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. गर्ग यांनी पोलीस अधिकार्‍यांना 1 हजार 500 रुपये रिवॉर्ड व पोलीस अंमलदारांना 500 रुपयांचे रिवार्ड आणि प्रमाणपत्र दिले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:54 AM 01-Aug-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here