कोरोनाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारला व्यापक रणनीती आखण्याची आवश्यकता – सोनिया गांधी

0

कोरोनाचे संकट रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन गरजेचे होते, मात्र त्याची अंमलबजावणीची पद्धत चुकीच्या पद्धतीने झाली आहे. यामुळे देशातील लाखो स्थलांतरीत मजुरांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे, अशा शब्दांत सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. सोनिया गांधी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे काँग्रेस पक्षाच्या वर्किंग कमिटीची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केले. कोरोनाचे संकट देशासमोर आहे. समस्यांचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारला आता व्यापक रणनीती आखण्याची आवश्यकता आहे. कारण कोरोनाचा फैलाव हा झपाट्याने होत आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
2:17 PM 02-Apr-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here