ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत ऋषि सुनक यांना झटका, लिझ ट्रस यांना दिग्गजांचा पाठिंबा

0

ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत ऋषि सुनक आणि लिझ ट्रस यांच्यामध्ये जोरदार टक्कर आहे.

ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत भारतीय वंशाचे ऋषि सुनक यांना झटका बसला आहे. ऋषि सुनक पंतप्रधानपदाच्या शर्यतीत मागे पडताना दिसत आहेत. ‘द टेलिग्राफ’च्या रिपोर्टनुसार, ब्रिटीश अर्थमंत्री नदिम झहावी यांनी लिझ ट्रस यांना कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या पुढच्या नेत्या होण्यासाठी औपचारिक पाठिंबा दिला आहे.

‘द टेलिग्राफ’च्या रिपोर्टनुसार नदिम झहावी यांनी लिझ ट्रस यांच्या समर्थनार्थ म्हटलं आहे की, ‘परराष्ट्र सचिव ट्रस जुन्या आर्थिक पुराणमतवादाला छेद देतील आणि आपली अर्थव्यवस्था पुराणमतवादी पद्धतीने चालवतील.’ असा उल्लेख ‘द टेलिग्राफ’च्या रिपोर्टमध्ये आहे. ब्रिटिश अर्थमंत्र्यांनी लिझ यांना पाठिंबा देणं ही ऋषी सुनक यांच्यासाठी चांगली बातमी नाही. मात्र, सुनक हे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या लिझ ट्रसला तगडी टक्कर देत आहेत.

झहावी यांच्या आधी ‘या’ दिग्गजांचाही ट्रस यांना पाठिंबा

ब्रिटनचे अर्थमंत्री नदीम झहावी यांनी लिझ यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देण्याआधीही अनेक दिग्गज नेत्यांनी लिझ यांना पाठिंबा दर्शवला आहे. दोनच दिवसांपूर्वी, ब्रिटनचे संरक्षण सचिव बेन वॉलेस यांनीही ट्रस यांना देशाच्या पुढील पंतप्रधान होण्यासाठी पाठिंबा दिला. संरक्षण सचिवांनी आपल्या निवेदनात लिझ ट्रस यांना पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार असल्याचं म्हटलं होतं.

‘द टाइम्स’मधील त्यांच्या लेखात त्यांनी लिझ याचं कौतुक केलं आहे. त्यांनी लिहिलं आहे की, ‘मी लिझ ट्रस यांच्यासोबत कॅबिनेट, द्विपक्षीय बैठकी आणि आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेत भाग घेतो. त्या ठोसपणे आपली भूमिका मांडतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या प्रामाणिक आहेत.’

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
5:15 PM 01-Aug-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here