सामाजिक कार्यकर्ते समद मालगुंडकर यांचा नवनिर्मिती फाउंडेशनच्या वतीने सत्कार

0

संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील कुरधुंडा गावचे रहिवासी सामाजिक कार्यकर्ते, एक दानशूर व्यक्तिमहत्व समद मालगुंडकर यांच्या कार्याची दखल घेत नवनिर्मिती फाउंडेशन उक्षीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

समाजात अनेक दानशूर व्यक्ती आहेत. त्यामधील परड्या मागे असून समाजातील लोकांना मदत करणारे पण प्रसिद्धी पासून लांब असणारे समद मालगुंडकर आणि त्यांचे बंधू आलीम मालगुंडकर. कामा निमित्ताने परदेशात असले तरी त्यांची नाळ येथिल मातीशी आहे. कारण येथिल संकटात असणाऱ्या माणसाच्या मागे मालगुंडकर परिवार भक्कम पणे उभे राहते. या कुटुंबातील व्यक्तीकडून अनेक लोकांना मदत करण्यात आली आहे. नवनिर्मिती फाउंडेशनच्या मागे समद मालगुंडकर आणि त्यांचे बंधू आलीम मालगुंडकर हे भक्कम पणे उभे आहे या संस्थेच्या जडणं घडणीत त्यांचे योगदान आहे. सामाजिक कामाची दखल घेत सोमवारी ओबोसीचे नेते आणि जि.प.माजी शिक्षण सभापती सहदेव बेटकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती सहदेव बेटकर, संस्थेचे अध्यक्ष रमजान गोलंदाज, सामाजिक कार्यकर्ते समद मालगुंडकर, शाळेचे उपाध्यक्ष जमुरत अलजी, लियाकत नेवरेकर, तैमूर अलजी, सलाउद्दीन बोट, पप्पू सुर्वे, ब्रीद, जयश्री डावल, संदेश निंगावले, मुख्यापिका नाझिमा बांगी, सिमरन मालदार, सुजेन अलजी, सारा फकीर, फातिमा खान उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:03 AM 02-Aug-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here