चीनवर पुन्हा कोरोनाचे सावट!

0

बीजिंग : चीनच्या वूहान शहरातून कोरोनाने विषाणूने सुरवात केल्यानंतर जगातील तब्बल १८०हून अधिक देशांमधेय या विषाणूने हाहाकार माजवला आहे. चीनानंतर अमेरिका, इटली, स्पेनसारख्या देशांमध्ये तर हजारो लोकांचे बळी गेले आहे. यानंतर चीनने संपूर्ण देशात लॉकडाऊन करून सर्व परिस्थिती पूर्वपदावर आणल्याचा दावा केला. मात्र आता चीनमधील परिस्थिती पूर्वपदावर येत असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. चीनच्या ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ने दिलेल्या वृत्तानुसार, चीनमध्ये एकाच दिवशी 36 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. चीनच्या हेनान प्रांतात 36 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे चीनवर पुन्हा एकदा कोरोनाचं संकंट ओढवण्याची भीती वर्तवली जात आहे. हे संकंट ओढवू नये म्हणून चीन प्रशासन पुन्हा एकदा सज्ज झालं आहे. चीनच्या पिंगडिंगशन शहरात जिया काउंटी या भागात हे नवे रुग्ण आढळून आले आहेत. हे सर्व बाहेरून प्रवास करून आले आहेत. या भागाची लोकसंख्या जवळपास 6 लाखांपेक्षाही जास्त आहे. कोरोनाचं संकंट लक्षात घेऊन प्रशासनाने ते शहर पूर्णपणे लॉकडाऊन घोषित करण्यात आलं आहे. एखाद्याला खरंच अतिशय महत्त्वाचं काम असेल तर त्यासाठीही प्रशासनाची मंजुरी घ्यावी लागत आहे. त्याशिवाय घरातून बाहेर पडता येणार नाही. यापूर्वीच चीनमध्ये कोरोनामुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर चीनी प्रशासनाने कोरोनावर नियंत्रण मिळवल्याचे घोशीतही केले. मात्र, हेनान प्रांतात पुन्हा सापडलेल्या नव्या रुग्णांनी चीनची पुन्हा एकदा डोकेदुखी वाढवली आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here