“फक्त 11 लाखांसाठी त्रास दिला जातोय”; संजय राऊतांच्या अटकेवर भडकल्या जया बच्चन

0

नवी दिल्ली : शिवसेना नेते संजय राऊत यांना पत्राचाळ प्रकरणी ईडीने अटक केली आहे. तसेच त्यांनी तीन दिवसांची ईडी कोठडीही ठोठावण्यात आली आहे.

संजय राऊत यांच्या अटकेचे राज्यात आणि संसदेत तीव्र पडसाद उमटले आहेत. बॉलिवूडमधूनही राऊत यांच्या अटकेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन या सुद्धा संजय राऊत यांच्या अटकेवर भडकल्या आहेत. केवळ 11 लाख रुपयांसाठी त्रास का दिला जात आहे? असा सवाल करतानाच 2024पर्यंतच हे सर्व सुरू राहील, असं जया बच्चन म्हणाल्या. या संपूर्ण प्रकरणाला भाजपच जबाबदार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

जया बच्चन यांचा ट्विटरवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जया बच्चन यांना संजय राऊत यांच्या अटकेबाबत प्रश्न विचारण्यात आला आहे. संजय राऊत यांना अटक करण्यात आली आहे. ईडीचा दुरुपयोग केला जातोय, असं तुम्हाला वाटतं का? असा सवाल जया बच्चन यांना करण्यात आला आहे. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अर्थातच. ईडीच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले पाहिजेत. 11 लाख रुपयांसाठी तुम्ही अशा प्रकारे कुणाला तरी त्रास देत आहात, असं जया बच्चन यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत यांची आई खूप वयस्कर आहे, असं विचारलं असता होय, मला माहीत आहे, असं जया बच्चन म्हणाल्या. ईडीचा वापर कधीपर्यंत चालेल असं तुम्हाला वाटतं? असा सवाल केला असता, जया बच्चन यांनी अत्यंत कठोर शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली. 2024पर्यंत हे सर्व चालेल, असं त्या म्हणाल्या.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:32 PM 02-Aug-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here