देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी मोदींनी प्रत्येक राज्याने सुरक्षेची काळजी घ्यावी आणि राज्याच्या मदतीला केंद्र नेहमीच तयार असेल, अशा सूचना दिल्या. मुखमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेवेळी PM मोदींनी देशातील लॉकडाऊनच्या स्थितीविषयी चिंता व्यक्त केली. राज्यांनी जनतेकडून लॉकडाऊनची कठोरपणे पालन करून घ्यावे, अशी सूचना त्यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिली. तसेच लोकांना जीवनावश्यक वस्तूंची टंचाई भासणार नाही याची काळजी राज्यांनी घ्यावी, अशी सूचनाही त्यांनी राज्य सरकारांना दिली.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
3:50 PM 02-Apr-20
