डी. जे. सामंत महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागाचे उद्घाटन

0

रत्नागिरी : डी. जे. सामंत वरिष्ठ महाविद्यालय कला, वाणिज्य आणि विज्ञान पाली, रत्नागिरी महाविद्यायातील अर्थशास्त्र विभागाचे सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षामध्ये उद्घाटन करण्यात आले.

या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालायाच्या प्राचार्या व अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. कांता कांबळे या उदघाटक म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते अर्थशास्त्रातील रचनात्मक बदल या विषयावर भित्तीपत्रक तयार केले गेले होते. या भित्तीपत्रकाचे उद्घाटन करण्यात आले. अर्थशास्त्राचे जनक अॅडम स्मिथ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. या अर्थशास्त्र विषयाच्या उद्घाटनप्रसंगी आर्थिक साक्षरता या विषयावर मार्गदर्शन आयोजित केले होते. या मार्गदर्शनासाठी क्रिसिल फाऊंडेशन इंडिया या संस्थेमार्फत चंद्रमणी सावंत हे उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अर्थशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख प्राचार्य डॉ. कांता कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थशास्त्र विषयाचे सहायक प्राध्यापक विनोद भुवड व अर्थशास्त्र विभागाचे सर्व विद्यार्थी यांनी अधिक मेहनत घेतली व हा कार्यक्रम यशस्वी केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अथर्व गार्डी, प्रास्ताविक प्रा. विनोद भुवड व आभार अंकिता मोहिते यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here