रत्नागिरी : चार दिवसांपासून पड़त असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात हाहाकार उडाला आहे. ठिकठिकाणी पडझड झाली असतानाच महावितरणचेही लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यातील १४७ गावांचा वीजपुरवठा बंद असून, पूर पातळी ओसरल्यानंतरच या गावांचा वीज पुरवठा सुरळीत होणार आहे. जिल्ह्यात मागील तीन दिवस पूर परिस्थिती आहे. मुसळधार पावसात अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून, पुलांवरूनही पाणी वाहत आहे. काही रस्त्यांवर दरडी कोसळल्याच्या घटनाही घडल्या आहेत. याचा परिणाम वाहतुकीवर झाला असून, अनेक मार्गावरील वाहतूक बंद आहे. पूर आणि जोराने वाहणाच्या वा-याचा फटका महावितरणलाही बसला असून, जिल्ह्यात एकूण ५० लाखांचे नुकसान झाले आहे. वाच्यामुळे वीजवहिन्यांवर तारा पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे. चिपळूण तालुक्यातील मुरादपूर गावात पुराचे पाणी शिरल्याने सबस्टेशन बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे परिसरातील गावे अंधारात आहेत. देवरूख आणि खेडमध्येही काही गावांचा वीजपुरवठा खंडीत आहे. जिल्ह्यात एकूण ४० किमीच्या लघुदाब वीजवाहिन्या तुटल्या आहेत तर लघू दाव वीज वाहिनीचे १६५ पोल आणि उच्च दाब वाहिनीच्या ३१ पोलांचे नुकसान झाले आहे. याचबरोबर तीन ट्रान्सफार्मरही नादुरूस्त झाले असून, एकूण ५० लाखांचे नुकसान झाले आहे. वीजपुरवठा खंडीत झालेल्या गावांमध्ये महावितरणचे कर्मचारी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहेत.
