रत्नागिरी : दिल्लीनजिकच्या हजरत निजामुद्दीन येथे मरकजला गेलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील ८ ते १० जणांचा समावेश होता. त्यापैकी 3 जण यापूर्वीच सापडले आहेत. उरलेल्यांपैकी रत्नागिरीत चौघांना शोधण्यात पोलीस प्रशासनाला यश आले आहे. आता रत्नागिरी शहरातील चौघांना जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या नातेवाईकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. चौघांच्या थुंकी, स्वाबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
6:15 PM 02-Apr-20
