कोंडगाव येथे बॅडमिंटन कोर्टचे उद्घाटन

0

साखरपा : कोंडगाव येथील बाळासाहेब ठाकरे बहुउद्देशीय सभागृहातील बॅडमिंटन कोर्टचे उद्घाटन माजी सभापती जयसिंग माने यांच्या हस्ते करण्यात आले.

कोंडगाव येथील जुना एसटी स्टँड येथे बाळासाहेब ठाकरे बहुउद्देशीय सभागृह बांधण्यात आले आहे. खा. विनायक राऊत आणि आ. राजन साळवी यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून हे सभागृह बांधण्यात आले आहे. याच सभागृहातील बॅडमिंटन कोर्टचे उद्घाटन माजी सभापती जयसिंग माने यांच्या हस्ते नुकतेच झाले.

गावातील खेळाडूंना व्यासपीठे मिळवून देण्यासाठी हे सभागृह बांधण्यात आल्याची भावना जयसिंग माने यांनी बोलून दाखवली. त्याचबरोबर येत्या काळात येथे अद्ययावत व्यायामशाळा आणि वाचनालय बांधण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी सरपंच बापू शेट्ये, भडकंबा सरपंच बापू शिंदे, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष श्रीधर कबनूरकर, आबा सावंत, अजित भोसले आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here