डोनाल्ड ट्रम्प यांचा दुसरा कोरोना रिपोर्ट आला….

0

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा कोरोनाची चाचणी करण्यात आली. या चाचणीत त्यांचा रिपोर्ट दुसऱ्यांदा निगेटिव्ह आला आहे. यासंबंधीची माहिती वृत्तसंस्था एएफपीने दिली आहे. दरम्यान, याआधीही डोनाल्ड ट्रम्प यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली होती. त्यावेळी सुद्धा त्यांच्या चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. गेल्या काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्राझिलच्या राष्ट्रपतींच्या प्रेस सेक्रेटरींची भेट घेतली होती. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी करोनाची चाचणी करावी अशी चर्चा होती, होती. या चर्चेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिली कोरोना चाचणी केली. मात्र, ती निगेटिव्ह आली होती.त्यानंतरही डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा कोरोनाची चाचणी केली ती सुद्धा निगेटिव्ह आली आहे. गेल्या महिन्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्लोरिडामधील एका रिसॉर्टमध्ये ब्राझिलचे राष्ट्रपती जेर बोलसोनारो आणि त्यांचे प्रेस सेक्रेटरी फॅबियो वाजेनगार्टन यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर ब्राझिलला गेल्यानंतर फॅबिओ वाजेनगार्टन यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. तर राष्ट्रपती जेर बोलसोनारो यांनी चाचणी निगेटिव्ह आली. त्यामुळे फॅबिओ वाजेनगार्टन यांच्या संपर्कात आल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनीही कोरोनाची चाचणी केली. दरम्यान, अमेरिकेत कोरोनामुळे हाहाकार माजला आहे. एकाच दिवसात कोरोनामुळे एक हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. जॉन्स हॉपकिन्स महाविद्यालयाच्या आकडेवारीनुसार अमेरिकेत एका दिवसात ११५९ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत अमेरिकेत मृत्यू झालेल्यांची संख्या पाच हजारहून अधिक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here