पाटपन्हाळे महाविद्यालयात क्रांतिसिंह नाना पाटील जयंती साजरी

0

पाटपन्हाळे : गुहागर तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाच्या वतीने क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी प्रमुख पाहूणे श्री. ज्ञानेश वैद्य यांच्या हस्ते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करण्यात आली. सदर कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य प्रमोद देसाई, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. जालिंदर जाधव, डॉ. प्रवीण सनये, प्रा. सौम्या चौधुले, डॉ. प्रसाद भागवत, डॉ. दिनेश पारखे, डॉ. सुभाष खोत, ग्रंथपाल श्री.

धनंजय गुरव, ग्रंथालय परिचर श्री. पर्शुराम चव्हाण, वरीष्ठ लिपिक श्री सुधीर टानकर, सौ. स्नेहल संसारे कनिष्ठ लिपिक श्री. विश्वनाथ कदम, श्री. नंदकुमार भेकरे, श्री. संदिप भेकरे, श्री. रवींद्र चव्हाण, श्री. महेश झगडे व विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रमोद देसाई यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्याचा थोडक्यात आढावा घेतला व उपस्थित मान्यवर, प्राध्यापकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना क्रांतिसिंह नाना पाटील जयंतीच्या हार्दीक शुभेच्छा दिल्या.. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. जालिंदर जाधव यांनी केले तर उपस्थित मान्यवर यांचे आभार डॉ. प्रवीण सनये यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here